वसई येथील मराठी वाङ्मय मंडळातर्फे येत्या १७ फेब्रुवारी रोजी ‘जागतिकीकरण आणि आपले महिन्याचे बजेट’ या विषयावर ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
काँग्रेस भवन, पारनाका, वसई येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास वसईकर नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले        आहे.
कार्यक्रमासाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश आहे. अधिक माहितीसाठी प्रा. मेधा हरपनकर यांच्याशी ०२५०-२३२३११० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Story img Loader