जिल्हा परिषदेच्यावतीने सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळव्दारा अमरावती विभागातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे १४ ते १६ मार्चदरम्यान येथील नेहरू स्टेडियमवर आयोजित केल्या आहेत.
विभागातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ जिल्हा परिषदेचे सुमारे ७५० महिला व पुरुष खेळाडू यात सहभागी होत आहेत. क्रीडा प्रकारांतर्गत कबड्डी, किक्रेट, खो-खो, व्हॉलिबॉल पास व स्ट्रोक बॅडिमटन, कॅरम, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, रिले, धावणे, उंच व लांब उडी, भाला, गोळा, थालीफेक इत्यादी प्रकार स्पर्धामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. सोबतच सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत.
क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनाकरिता अमरावती विभागीय आयुक्त डी.आर. बन्सोड, अमरावतीच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, वाशीमच्या उषा चौधरी, अकोल्याच्या पुष्पा इंगळे, बुलढाण्याच्या वर्षां वनारे, यवतमाळचे प्रवीण देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, वाशीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी माळकोकीकर, अकोल्याचे आनंद जगताप, बुलढाण्याचे ओमप्रकाश देशमुख, यवतमाळचे नवलकिशोर राम, यवतमाळचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, ययाती नाईक, मनमोहनसिंग चव्हाण व सुभाष ठोकळ, प्रभाकर उईके, प्राजक्ता मानकर, विजय संतान व सर्व सदस्य व सभापती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विभागीय क्रीडा स्पर्धाच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व विनय ठमके यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसाधारण सभा येथे ८ मार्चला झाली.
या सभेकरिता जि.प. अंतर्गत सर्व संवर्गाच्या संघटनाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. विभागीय स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन क्रीडा मंडळाचे सचिव विलास चावरे, क्रीडा प्रमुख सुभाष धवसे, अनिल त्रिवेदी, श्याम पाचपोर, संदीप शिवराम पवार, मिलिंद देशपांडे, डॉ. दिलीप चौधरी, विनायक ठाकरे, विजय बुटके, राजस्वी चव्हाण, शुभांगी सारडे, सरिता लंगोटे अर्पिता चोपडे आदींनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा