क्रीडा वृत्त
नाशिकचा रोहन देशमुख व मुंबईची आकांक्षा निटुरे यांनी नाशिक जिमखाना व आर. पी. टेनिस फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. १० वर्षांच्या आतील वयोगटासाठी ही स्पर्धा झाली.
अंतिम सामन्यात रोहनने नाशिकच्या सुमेध भामरेचा २-१ तर मुलींमध्ये नवी मुंबईच्या आकांक्षा निटुरेने मुंबई उपनगरच्या सुदिप्ता कुमारचा २-० असा पराभव केला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ ज्येष्ठ क्रीडा संघटक नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, राजीव देशपांडे, लक्ष्मण अंबुलकर, अनिल साबळे, अमित शुक्ल, मनीष शास्त्री आदींच्या उपस्थितीत झाला. सूत्रसंचालन प्रशिक्षक राकेश पाटील यांनी केले.
राजश्री शिंदे यांचा गौरव
५८ व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल (१९ वर्षांआतील) महिला स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या महाराष्ट्र संघाची कर्णधार राजश्री शिंदे हिचा येथील एचपीटी महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राजश्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे राज्य क्रीडा व्हॉलीबॉल मार्गदर्शक राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मध्य प्रदेशातील या स्पर्धेत केलेल्या सवरेत्कृष्ट कामगिरीबद्दल गोखले एज्युकेशन संस्थेचे विभागीय सचिव प्रा. बी. देवराज यांच्या हस्ते राजश्री व तिच्या आईचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा