प्रत्येक गावात व्यायामशाळा बांधण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. यापुढे व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ७ लाख रुपये देण्यात येतील. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र मागे राहू नये यासाठी मार्च २०१४ पर्यंत राज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल बांधणार असल्याचे क्रीडा मंत्री वळवी म्हणाले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कवायतीचा तास बंधनकारक करण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात ४०० ते ५०० कोटींची तरतूद क्रीडा विकासासाठी करणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी सांगितले.
देवरी येथे तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती उषा शहारे, उपविभागीय अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री राजेश चांदेवार, तुळशीराम गहाणे, संदीप भाटिया, पार्वता चांदेवार, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, क्रीडा व युवक कल्याण विभाग नागपूरचे उपसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, तहसीलदार प्रताप वाघमारे, देवरीचे सरपंच संतोष मडावी, राधेश्याम बगडीया, मंदिरा वालदे व उषा मेंढे यांची उपस्थिती होती.
राज्य सरकारने एप्रिल २०१२ मध्ये राज्याचे क्रीडा धोरण जाहीर केले. क्रीडा धोरणामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांचे सुप्त क्रीडा गुण दाखविण्याची संधी मिळणार आहे. हे खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवतील. त्यामुळे राज्याच्या क्रीडा धोरणाचा तरुणांच्या जडणघडणीत मोठा सहभाग असणार आहे. २००९ च्या शासन निर्णयानुसार तालुका क्रीडा संकुल निर्मितीसाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तरुणांच्या कौशल्य विकासासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. स्पध्रेच्या युगात टिकण्यासाठी ग्रामीण भागातील युवावर्गाने जागरूक होऊन लक्ष द्यावे. प्रत्येक गावात व्यायामशाळा बांधण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. यापुढे व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ७ लाख रुपये देण्यात येतील. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र मागे राहू नये यासाठी मार्च २०१४ पर्यंत राज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल बांधणार ओहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कवायतीचा तास बंधनकारक करण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात ४०० ते ५०० कोटींची तरतूद क्रीडा विकासासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे म्हणाले, देवरी ,सालेकसा व आमगाव येथील तालुका क्रीडा संकुल २.६६ हेक्टर जागेवर तयार होणार आहे. प्रत्येक संकुल निर्मितीवर १ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. वेगवेगळ्या प्रकारची मदाने या संकुलात राहणार असून शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या अनामत रकमेतून क्रीडा संकुलाची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन गोवर्धन मेश्राम यांनी केले. आभार तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी मानले.
क्रीडा धोरण तरुणांच्या जडणघडणीसाठी उपयुक्त-वळवी
प्रत्येक गावात व्यायामशाळा बांधण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. यापुढे व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ७ लाख रुपये देण्यात येतील. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र मागे राहू नये यासाठी मार्च २०१४ पर्यंत राज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल बांधणार असल्याचे क्रीडा मंत्री वळवी म्हणाले.
आणखी वाचा
First published on: 29-12-2012 at 03:47 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports policy is useful for creation of youth valvi