अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावरील स्पर्धामध्ये पुणे विद्यापीठाकडून सहभागी होत चार सुवर्ण, दोन रौप्य व ११ कांस्य पदकांची कमाई करणाऱ्या येथील के.टी.एच.एम. महाविद्यालयास क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेबद्दल देण्यात येणाऱ्या ‘डॉ. वसंतराव पवार स्पोर्टस् मेरीट ट्रॉफी’ देऊन पुणे विद्यापीठाने गौरविले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते हा चषक महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धोंडगे, क्रीडा सचालक प्रा. बी. बी. पेखळे यांनी स्वीकारला. यावेळी पोलीस अधिकारी गुलाबराव पोळ, डॉ. व्ही. बी. गायकवाड हेही उपस्थित होते.
आतापर्यंत सात वेळी पुणे विद्यापीठाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळविणारे केटीएचएम हे एकमेव महाविद्यालय आहे.
या खेळाडुंना महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख प्रा. बी. बी. पेखळे, प्रा. डी. एम. आहेर, प्रा. के. पी. लवांड, प्रा. ए. एम. कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

Story img Loader