शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. कायदेही करण्यात आले. मात्र, त्याचा काही उपयोग होत नसून नागरिकांचा त्यात सहभाग असणे आवश्यक आहे. शालेय विद्याथ्यार्ंच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश घरोघरी पोहचला पाहिजे त्यादृष्टीने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
महापालिकेच्या आरोग्य व शिक्षण विभागाच्या वतीने ‘प्लास्टिक मुक्त शहर’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महापौर अनिल सोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, सागर मित्र प्रतिष्ठान पुण्याचे सहसंघटक विनोद बोधनकर, शिक्षण समिती सभापती चेतना टांक, मनीषा घोडेस्वार, संदीप जोशी आदी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांनी स्वयंपूर्ण खेडय़ाची संकल्पना सांगितली होती. खेडय़ामध्ये टुथब्रश ऐवजी कडूलिंबाच्या काडय़ा वापरल्या जातात. त्या निसर्गाशी एकरूप होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन कायम राहते. मात्र, गेल्या काही वर्षांत पाश्चात्य जीवन पद्धतीचा अवलंब वाढत आहे. अमेरिकेमध्ये भारतापेक्षा २५ पटीनी कचरा निर्माण केला जातो. त्यावर प्रक्रिया करून तेथील सागरामध्ये डम्प केला जातो. पेट्रोल व पेट्रोलजन्य पदार्थावर सनियंत्रण करण्यासाठी पाश्चात्य देशामध्ये संघर्ष सुरू आहे. प्लास्टिकच्या अनिबर्ंध वापरावर बंधने घालण्यात आली, परंतु यामध्ये हितसंबंध असणाऱ्या उत्पादक कंपन्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून हा प्रयत्न हाणून पाडला. अशा प्रकारे पाश्चात्य जीवन पद्धती निसर्गाचे संतुलन बिघडविण्यास कारणीभूत आहे, असेही अनुपकुमार म्हणाले.
महापौर अनिल सोले म्हणाले, वापरा आणि फेकून द्या ही संस्कृती फोफावत आहे. मनुष्याला आरामात जगण्याची सवय लागली आहे. महापालिकेतर्फे नागनदी, पिवळी नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबविले जात असून त्याचे महत्त्व येणाऱ्या दहा वषार्ंत लक्षात येईल. मनुष्याने निसर्गाचे शोषण चालविले आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन साधले नाही. घरोघरी कचरा उचलण्याची व्यवस्था केली, परंतु हा कचरा वेगळा केला जात नाही. त्यादृष्टीने प्लास्टिक मुक्त शहर ही अभिनव संकल्पना आहे. विद्याथ्यार्ंनी दर महिन्याच्या शेवटी घरचे टाकावू प्लास्टिक गोळा करावे व  ते थेट विक्रेत्यांना देऊन त्यातून आलेल्या पैशाचा विनियोग शाळेच्या कल्याणासाठी कसा करावा हे संबंधित शाळेने ठरवायचे आहे. त्यासाठी एका शिक्षकांकडे ही जबाबदारी सोपवावी. ऑगस्ट क्रांती दिन म्हणजे ९ ऑगस्टपासून ही योजना शाळांमध्ये राबविली जाईल, असेही महापौर सोले यांनी सांगितले. यावेळी आयुक्त श्याम वर्धने यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सिंगारे यांनी केले. विनोद बोधनकर यांनी पॉवर पॉइर्ंटद्वारे मुंबईमधील शाळांमध्ये सुरू असलेल्या प्लास्टिक मुक्त अभियानाची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा