लासलगावहून चांदवडला निघालेल्या एसटी बसचा बुधवारी सकाळी ‘स्टेअरिंग रॉड’ तुटून ही बस खड्डय़ात जाऊन पडली. या अपघातात चालक-वाहकासह १२ प्रवासी जखमी झाले. या वेळी जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्याऐवजी एसटीच्या अधिकाऱ्यांनी केवळ चालक व वाहकास नेल्याने प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. लासलगाव काजी सांगवीमार्गे चांदवड बस चालक एस. आर. थोरात व वाहक आय. ए. कनवाळे हे घेऊन चांदवडकडे निघाले होते. बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह काही प्रवासी होते. लासलगावहून बाहेगाव साळच्या अलीकडे गांगुर्डे वस्तीजवळ बस आली असता बसचा ‘स्टेअरिंग रॉड’ तुटल्याने ती खड्डय़ात जाऊन अडकली. या अपघातात १० ते १५ जण जखमी झाले. प्रवासी काजी सांगवी यांनी सावरत सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेतून जखमींना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यानच्या काळात लासलगाव बस आगाराच्या व्यवस्थापक मनीषा सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, जखमी प्रवाशांची विचारपूस न करता केवळ जखमी बसवाहक व चालकाला घेऊन निघाल्याने संतप्त जखमी प्रवासी व नागरिकांनी रोष व्यक्त केला. काही प्रवाशांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर काही जण किरकोळ जखमी होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा