कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा ते हदगाव रस्त्यावरील चुंचा पाटीजवळ एस.टी. बस आणि मालमोटारीचा भीषण अपघात झाल्याने नऊ जण ठार झाले. या अपघातात २५ जण जखमी झाले असून, जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. हा अपघात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. अपघात एवढा भीषण होता, की सात जण जागीच ठार झाले. बसचा पत्रा एका बाजूने पूर्णत: फाटला गेला. या अपघातामधल्या एकाच व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव बालाजी कुबडे असे आहे. त्याची आई आणि मुलगी या अपघातात जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ट्रकचालकाने अपघातापूर्वी एका म्हशीला धडक दिली होती. त्यामुळे त्याचा कोणीतरी पाठलाग करीत होतो, त्यामुळे बेभान होऊन चालक ट्रक दामटत होता.
पुसद- लातूर ही बस (क्र. एमएच ४०-८९५०) रविवारी साडेपाचच्या सुमारास चुंचा पाटीजवळ आली होती. हदगावकडे जाणाऱ्या मालमोटारीने (क्र. ओआर.-आर ०८५९) बसला धडक दिली. धडकेनंतर गाडीचा पत्रा फाटल्याने सात प्रवासी जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना नांदेड येथील रुग्णालयात पाठविण्याची त्यांनी व्यवस्था केली. या अपघातात २५ जण जखमी झाले. जखमींना नांदेडकडे नेताना रस्त्यात दोघांचा मृत्यू झाला. ट्रकचालकाचे नाव रमेश पारधी असल्याचे स्पष्ट झाले असून मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
बसचा पत्रा फाटल्याने ९ ठार, २५ जखमी
कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा ते हदगाव रस्त्यावरील चुंचा पाटीजवळ एस.टी. बस आणि मालमोटारीचा भीषण अपघात झाल्याने नऊ जण ठार झाले. या अपघातात २५ जण जखमी झाले असून, जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले.
Written by badmin2
Updated:
First published on: 09-12-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus truck accident 9 killed 25 injured