एस. टी. महामंडळाच्या भंडारा आगारातील चालक सैय्यद इक्रामउद्दीन आणि वाहक केवलराम जिभकाटे यांचा सेवानिवृत्तीच्या दिवशी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या या विभाग शाखेद्वारा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख संजय डफरे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्य संघटनेचे उपाध्यक्ष इजाजउद्दीन, राज्य संघटनेचे विभागीय अध्यक्ष विवेक पेंढारकर, विभागीय सचिव सुनील पशिने उपस्थित होते. या साऱ्यांनी इक्रामउद्दीन व वाहक जिभकाटे यांच्याप्रति गौरवोद्गार केला. आगार प्रमुखांनी सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान केले. याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना, सैय्यद इक्रामुद्दीन यांनी, आपल्या ३६ वर्षांच्या अनुभवाचा आढावा घेत आजच्या एस.टीच्या नाजूक आर्थिक परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले. अध्यक्षीय भाषणात आगार व्यवस्थापक संजय डफरे यांनी कामगार वर्गाच्या सहकार्यानेच व इच्छाशक्तीने एस.टी.विकासोन्मुख होऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली. प्रास्ताविक दुर्गेश सिंह काछवाह यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल पशिने यांनी केले. आभार कुमार चाटोले यांनी मानले. याप्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवरात सैय्यद राजिक, सर्जिल खान, प्रभु घोरपडे, अमजद खान, आसिफ खान होते.
एस. टी. महामंडळाने व्यवस्थापन सुधारावे -सैय्यद इक्रामुद्दीन
एस. टी. महामंडळाच्या भंडारा आगारातील चालक सैय्यद इक्रामउद्दीन आणि वाहक केवलराम जिभकाटे यांचा सेवानिवृत्तीच्या दिवशी
First published on: 27-12-2013 at 12:59 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St mahamandal must develop syed fakhruddin