होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीने जादा गाडय़ा सोडण्यात येणार       आहेत.
२२ ते २७ मार्च या कालावधीत जादा गाडय़ा सोडण्यात येतील. महामंडळाच्या ठाणे विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, बोरिवली नॅन्सी कॉलनी, कल्याण, विठ्ठलवाडी आगारांमधून या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
 एक महिना आधीपासून या जादा गाडय़ांचे आरक्षण भाविकांना करता येणार आहे. आरक्षणासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि बोरिवली येथे खासगी एजंटही नियुक्त करण्यात करण्यात आले असल्याचे महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले      आहे.

Story img Loader