राज ठाकरे यांचे महापौर व पालिका प्रशासनास निर्देश
शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबवावी आणि अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी माती व कचऱ्याचे ढिगारे तसेच झाडाच्या तोडलेल्या फांद्या पडल्या असून त्या तात्काळ हटविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आपण महापालिका प्रशासन व महापौरांना दिले असल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज यांनी पालिका आयुक्त संजय खंदारे यांच्यासह महापौर अॅड. यतिन वाघ यांच्याशी सोमवारी सकाळी चर्चा केली.
त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक मुद्यांवर विचारविनिमय केल्यावर त्यांची स्वारी राजगड या पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाली. न्यायालयाचा आदेश आल्याशिवाय पालिका अतिक्रमण हटवित नाही अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. या मुद्यावर बोलताना राज यांनी शहरात अस्ताव्यस्तपणे पसरलेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याची सूचना आपण प्रशासनाला केल्याचे नमूद केले. या अतिक्रमणांमध्ये मनसेच्या पदाधिकारी वा लोकप्रतिनिधीच्या बांधकामांचा समावेश असेल अथवा त्यांनी या मोहिमेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तरी कोणाचे ऐकू नका, असे स्पष्टपणे बजावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यांच्या कडेला अनेक ठिकाणी माती व कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. वीज वाहिन्यांसाठी अडसर ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. त्याही रस्त्यावरच पडून आहेत. पालिकेने हे सर्व तातडीने हटवून शहर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील महिन्याच्या सुरूवातीला म्हणजे नऊ ते ११ जुलै दरम्यान आपण शहराचा दौरा करणार असून त्यावेळी या विषयात काय कार्यवाही झाली त्याची छाननी केली जाईल, असेही राज यांनी नमूद केले.
पालिका आयुक्तांशी झालेल्या बैठकीत गोदा पार्क व रस्त्यांच्या कामांविषयी चर्चा करण्यात आली. त्याचे दृश्य स्वरूप दिसण्यास अजून पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल. मागील अनुशेष इतका बाकी होता की तो काढण्यात बराच वेळ गेला. शहराचा विकास व्हावा ही आपली आवड आहे. मनसेला सत्ता मिळाली म्हणून काम करायचे, असा त्यात भाग नसतो. सत्तेचा आनंद लुटणे हा आपला स्वभाव नाही. प्रेमाला जागणे हा आपला स्वभावधर्म आहे. त्यामुळे नाशिककरांची कधी प्रतारणा होणार नाही. जो विकास नागरिकांना अपेक्षित आहे, तोच आपणास अपेक्षित आहे. केवळ त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करा, असा सल्ला राज यांनी पुन्हा एकदा दिला.
अतिक्रमणांविरोधात मोहीम राबवा!
राज ठाकरे यांचे महापौर व पालिका प्रशासनास निर्देश शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबवावी आणि अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी माती व कचऱ्याचे ढिगारे तसेच झाडाच्या तोडलेल्या फांद्या पडल्या
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-06-2013 at 08:43 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Start campaign against illegal constructionsays raj thackeray