भारतीय स्टेट बँकेने सामाजिक उत्तरदायित्वातून वर्धा मार्गावरील खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनला ‘कलर डॉप्लर’ हे यंत्र खरेदी करण्यासाठी १५ लाखांची देणगी दिली. या यंत्राचा उपयोग खापरी परिसरातील ५० गावातील रुग्णांना होणार आहे.
भारतीय स्टेट बँकेचे उपमहाव्यवस्थापक बी. संकर यांनी १५ लाखांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता व अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केला. याप्रसंगी बी. संकर यांनी स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या कामाची पाहणी केली व मिशनच्या सामाजिक उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. मिशनच्या कार्याची अपरिहार्यता बघून स्टेट बँक नेहमी मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी दिलीप गुप्ता यांनी संस्थेच्या कार्याची माहिती बी. संकर यांना दिली. संस्थेचे सहसचिव उल्हास बुजोणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी स्टेट बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक रामकृष्णन व करंडे, शाखा व्यवस्थापक तलवारे, देशपांडे, जोग, हेमंत वसू तसेच स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे मनोहर वैद्य, मुडे, डॉ. बापट, गौतम, डॉ. सारगावकर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा