राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना १० टक्के महागाई भत्ता देण्याचे जाहीर करून आणि या भत्त्यासह येत्या २४ ऑक्टोबरपासून या महिन्याचे वेतन अग्रीम अदा करण्याचे पाऊल उचलून राज्य शासनाने लाखो कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. महागाई भत्ता वाढविण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात किमान १५०० ते १० हजार रुपयांपर्यंतची वाढ होणे अपेक्षित आहे.
राज्यातील २० लाख कर्मचाऱ्यांना या महिन्याचे वेतन २४ ऑक्टोबरपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. दिवाळीनिमित्त राज्य कर्मचाऱ्यांसह इतरांचे वेतन २४ ऑक्टोबरपासून देण्याचे राज्य शासनाच्या वित्त विभागाने ठरवले आहे. ही माहिती वित्त विभागाने १५ ऑक्टोबरच्या आदेशान्वये दिली असल्याचे कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे यांनी कळवले आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच, जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मिळून राज्यातील २० लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांना या निर्णया लाभ मिळणार आहे. शिवाय ऑक्टोबरच्या वेतनात १० टक्के महागाई भत्त्याचीही वाढ मिळणार असून त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५०० ते १० हजार पर्यंत वाढ होईल आहे. यासोबतच पाच लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०१३चे सेवानिवृत्ती वेतनही २४ ऑक्टोबरपासून अदा करण्याचे आदेश देण्यात आले असून १० टक्के वाढीव महागाई भत्त्यामुळे १ हजार ते आठ हजापर्यंत जास्त पेंशन मिळणार आहे. राज्य व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याची करण्यात मागणी आली होती, असे सोहन चवरे यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा