अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आवाहनानुसार देशातील ८० लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांकडे केंद्र शासन व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रहास सुटे, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सचिव अशोक थुल यांनी राष्ट्रीय स्तरावरील ज्वलंत मागण्यांसंबंधात देशात होत असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. पुढील आंदोलनाकरिता सज्ज राहण्याचे आवाहन केले. वाढत्या महागाईवर नियंत्रण करण्यात यावे, सामाईक वेतनावर तसेच ठेकेदारी व कंत्राट पद्धतीने कामगारांची नेमणूक करण्यात येऊ नये, राष्ट्रीय पेंशन योजना २०१३ रद्द करण्यात यावी, रिक्ता जागा भरण्यात याव्यात, पन्नास टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात यावा इत्यादी मागण्यांची पूर्ती व्हावी म्हणून त्यांनी आंदोलन केले.

Story img Loader