५४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीवर मुंबई केंद्रातून ‘युटोपिया कम्युनिकेशन्स’ची निर्मिती असलेल्या ‘ती’ या नाटकाने विजयाची मोहोर उमटवली आहे. या नाटय़ संस्थेला ‘ती’ या नाटकासाठी २० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले असून या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. ‘ती’ या नाटकाचे लेखन ‘लोकसत्ता’चे पत्रकार रोहन टिल्लू यांनी के ले असून त्यांना या नाटकासाठी उत्कृष्ट अभिनयाचा प्रथम पुरस्कारही जाहीर झाला आहे.
गिरगावमधील साहित्य संघ मंदिरात २८ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. यात एकूण १६ नाटय़प्रयोग सादर करण्यात आले होते. प्राथमिक फेरीत नाटय़निर्मितीच्या प्रथम पुरस्कारासह सवरेत्कृष्ट दिग्दर्शन, सवरेत्कृष्ट रंगभूषा आणि उत्कृष्ट अभिनय असे तीन पुरस्कार ‘युटोपिया कम्युनिकेशन्स’च्या ‘ती’ या नाटकाने मिळवले. तर नवी मुंबईच्या ‘श्री शिवसमर्थ असोसिएशन’ या संस्थेच्या ‘खजिन्याची विहीर’ या नाटकाला १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि वाशीतील ‘टाऊन लायब्ररी’ या संस्थेच्या ‘सारी रात्र’ या नाटकाला १० हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अशोक ढेरे, चंद्रकांत मेहेंदळे, रवींद्र कुलकर्णी यांनी काम पाहिले. राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार प्रीतेश सोढा (ती), सवरेत्कृष्ट रंगभूषेसाठी सुभाष बिरजे (ती) हे पुरस्कारही या नाटकाने पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा