गोंदिया पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला शहरातील २० सार्वजनिक नळांचे कनेक्शन बंद करण्याबाबत पत्र दिले आहे, मात्र नगरसेवकांनी भर उन्हाळ्यात असे करणे योग्य होणार नसल्यामुळे सध्या नळ कनेक्शन बंद करण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतल्याने सध्या ही कारवाई थांबवण्यात आली आहे.
पालिकेने शहरातील २० सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. जे नळ कनेक्शन बंद करायचे आहे, त्यांची यादीही नगर पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला दिली आहे. मार्च महिन्यातच नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम सुरू होणार होती. मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता बन्नोरे यांना दूरध्वनीवरून ही मोहीम काही दिवस थांबवण्याची सूचना दिल्याची माहिती आहे.
नगरसेवकाकडून नळ कनेक्शन बंद करण्याला विरोध करण्यात येत आहे. नळ कनेक्शन बंद करणे कितपत आवश्यक आहे, याची माहितीही मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकांना दिली आहे. या सार्वजनिक नळ कनेक्शनमुळे नगर पालिकेला चांगलाच आíथक फटका सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने २० सार्वजनिक नळ बंद केल्यास शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यात भटकंती करावी लागेल, त्यामुळे ही मोहीम पावसाळ्यात सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली असल्याची माहिती आहे.
नगर पालिकेंतर्गत शहरात सध्या ९० सार्वजनिक नळ आहेत. यापूर्वी शहरात ४५० सार्वजनिक नळ जोडणी होती. यानंतर नगर पालिकेने हळूहळू ३६० सार्वजनिक नळ बंद केले. दोन वर्षांपूर्वी पालिकेने १६१ नळ कनेक्शन बंद केले होते. यानंतर केवळ ९० सार्वजनिक नळ सुरू आहेत.

Story img Loader