विदेशी मद्यांचा साठा असलेले एक हजार २०२ खोके बेकायदेशीरपणे घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील नगाव शिवारात पकडला. या कारवाईत ट्रकसह तब्बल ९५ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ट्रक चालकाला अटक झाली असून न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
सोमवारी रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. नाशिककडून येणारा  एक ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये विदेशी बनावटीचे मद्य असलेले एक हजार २०२ खोके आढळले. चालक मखनसिंग तारासिंग खजाना यास अटक करण्यात
आली.

Story img Loader