कथाकार दिवाकर कृष्ण हा समीक्षाग्रंथ डॉ. अनिता वाळके यांच्या पीएच.डी.चा संशोधन विषय होय. अलीकडच्या कालखंडात विद्यापीठीय संशोधन क्षेत्रात श्रेणीनुसार कार्यक्रमास हातभार लावण्यासाठी व आर्थिक मानबिंदू उंचावण्यासाठी अध्यापकांचे संशोधन झपाटय़ाने होताना दिसते. आयएसबीएन नामावलीत ही ग्रंथसंपदा येण्यासाठी या क्षेत्रात सध्या स्पर्धा लागलेली आहे. कुठलीही घाई म्हटली की, त्यात दोष आलेच, असाच मुद्रित शोधनाचा येथे आढळून येतो.
प्रस्तुत ग्रंथ कथा वाड्मयाचे नवसर्जन दिवाकर कृष्ण यांच्या कथा वाड्मयाची चिकित्सा करणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ एकूण सात प्रकरणात विभागला आहे. त्यात दिवाकर कृष्णपूर्व मराठी लघुकथा, भाषांतरित व अनुवादित कथा, दिवाकर कृष्ण केळकर यांचा चरित्रपट, कथाकार दिवाकर कृष्ण, दिवाकर कृष्णोत्तर कथा, दिवाकर कृष्ण केळकर यांच्या कथेचा आढावा व शेवटी संदर्भ ग्रंथसुची दिलेली आहे.
मराठीतील कथावाड्मय हे गोष्ट येथून निर्माण झाली आहे. कथेचा पूर्वेतिहास, प्रकार, करमणूक, कालखंड, समकालीन कथाकार या सर्वाचा डॉ. वाळके धांडोळा घेतांना दिसतात. दिवाकर कृष्ण हा विषय संशोधनासाठी का निवडला, या विषयीची भूमिका ग्रंथात कुठेही नाही. दिवाकरांचे बालपण, शिक्षण व्यवसाय, संसारिक जीवन, वाड्मयीन योगदान त्यांच्या कथेची वैशिष्टय़े इत्यादी ंविषयीची मुद्देसुद मांडणी दिवाकरांच्या लौकिक जीवनाचा परिचय वाचकांना करून देणारी अशीच आहे. कथाकार दिवाकर कृष्ण या विषयाचे लेखिकेने संशोधन केल्याने त्यासंबंधीची माहिती त्या नमूद करतात. १९२२ पासून दिवाकरांनी मनोरंजन मासिकातून कथालेखन केले. त्या इतिहास सांगण्याबरोबरच निवडक कथांचे संवादही त्या ग्रंथात उद्धृत करतात. दिवाकर कृष्ण यांच्या कथेचे विविध पैलू नोंदवताना डॉ. अनिता वाळके त्यांच्या कथांची मर्यादाही सांगतात. त्यामुळे समीक्षेच्या मुलभूत कक्षेत कथाकारांचे आकलन वाचकांना होत जाते, मात्र या मर्यादा म्हणजेच निष्कर्ष अतिशय संक्षिप्त झाल्याचेही लक्षात येते व दिवाकरांच्या कथांचे गुणगाण करण्यात, इतिहास सांगण्यात डॉ. वाळके अधिक पाने खर्ची घालतात. दिवाकरांच्या अनेक कथांचा वारंवार उल्लेख करायला लेखिका काही केल्या टाळत नाही. वत्स विनायक प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या या ग्रंथाला संजय सोनवाणे यांचे मुखपृष्ठ लाभले आहे. १५० रुपये किमतीचा हा ग्रंथ १०६ पृष्ठसंख्या मजकुराने समृध्द पावला आहे.
दखल : दिवाकर कृष्ण यांचे कथाविश्व
कथाकार दिवाकर कृष्ण हा समीक्षाग्रंथ डॉ. अनिता वाळके यांच्या पीएच.डी.चा संशोधन विषय होय. अलीकडच्या कालखंडात विद्यापीठीय संशोधन क्षेत्रात श्रेणीनुसार कार्यक्रमास हातभार लावण्यासाठी व आर्थिक मानबिंदू उंचावण्यासाठी अध्यापकांचे संशोधन झपाटय़ाने होताना दिसते.
आणखी वाचा
First published on: 23-12-2012 at 01:53 IST
मराठीतील सर्व विदर्भरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story world of diwakar krishna