कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकातील स्कायवॉकला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत फेरीवाले याठिकाणी तळ ठोकून असतात. त्यामुळे प्रवाशांना या भागातून चालणे अवघड झाले आहे. महापालिका, पोलीस तसेच रेल्वे अधिकारी यांच्या संगनमताने फेरीवाले हा व्यवसाय करीत असल्याचे बोलले जाते.
पालिकेच्या ‘क’ प्रभागाच्या अंतर्गत हा विभाग येतो. या प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाकडून स्कॉयवॉक अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांकडे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात दररोज ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांनी याविरोधात महापालिका तसेच रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. तरीही स्कॉयवॉक अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत असल्याचे चित्र दिसत आहे. कल्याण स्थानक अडवून बसणारे बहुतांश फेरीवाले भायखळा, मुंब्रा, अंधेरी, कुर्ला येथून आलेले आहेत. प्लॅस्टिक वस्तू, पुस्तके, कपडे, चप्पल विक्रीचे व्यवसाय याठिकाणी सुरू असतात. त्यामुळे स्कायवॉकच्या सहा फूट रुंदीच्या पदमार्गावरून चालताना प्रत्यक्षात दोन फुटांचा रस्ता प्रवाशांना ये-जा करण्यास उपलब्ध होत आहे. हे फेरीवाले म्हणजे काही महापालिकेच्या ‘क’ प्रभाग कार्यालयातील काही कर्मचारी, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांसाठी दुभती गाय असल्याचे बोलले जाते. महापालिका आयुक्त श्यामसुंदर पाटील हे प्रभारी असले तरी माजी आयुक्त शंकर भिसे यांच्यापेक्षा त्यांनी गेल्या काही दिवसांपासून कामाचा धडाका लावला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा