आर.एम.मोहिते इंडस्ट्रीजमधील सुमारे ५०० कामगारांनी पगार वाढीसाठी करवीरकामगार संघाच्या (आयटक) नेतृत्वाखाली सुरू केलेले काम बंद  आंदोलन मागे घेतले आहे. या वेळी झालेल्या वाटाघाटीनुसार कंपनी व्यवस्थापन व संघटना यांच्यामध्ये वाटाघाटी होऊन १ सप्टेंबर २०१२ पासून तात्पुरती ८०० रुपयांची पगारवाढ देऊन उर्वरित करार ३१ डिसेंबर २०१२ अखेर पूर्ण करण्याचे ठरले.     
ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार संघटित होते. गेली ४ दिवस आंदोलन तीव्र झाले होते. संघटनेने लेखी पत्र दिले होते. त्यावर कंपनीने सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पत्र दिले. त्यानुसार कंपनी व्यवस्थापन व संघटना यांच्यामध्ये वाटाघाटी होऊन १ सप्टेंबर २०१२ पासून तात्पुरती ८०० रुपये पगारवाढ देऊन उर्वरित करार ३१ डिसेंबर २०१२ अखेर पूर्ण करण्याचे ठरले.     
कंपनीतर्फे कार्यकारी संचालक अभय भिडे, एस.एम.मगदूम, किरण मोहिते, अ‍ॅड.टी.बी.वझे,संघटनेतर्फे गोविंद पानसरे, कॉ.विक्रम कदम, कॉ.बाबा यादव, कॉ.बाबा ढेरे, कॉ.रघुनाथ कांबळे, अ‍ॅड.बाळासो पोवार व संघटना कमिटी यांनी समझोता केला.
संप मिटल्यानंतर कंपनीतील सर्व कामगारांनी फटाके व गुलाल उधळून आनंद साजरा केला. त्यामध्ये तुकाराम शिंदे, विजय नलवडे, भगवान यादव, संपत खाडे, अभिजीत गोळे, आदिक वडंगर इत्यादी कामगार यांनी संप यशस्वी केला.

Story img Loader