आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरूअसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका चिमुकल्यांनाही सहन करावा लागत आहे. गेल्या १९ दिवसांपासून अंगणवाडय़ा बंद आहेत. त्यामुळे पोषण आहारापासूनही चिमुकल्यांना वंचित राहावे लागत आहे.
जिल्हय़ात २ हजार ४०६ मोठय़ा अंगणवाडय़ा मंजूर आहेत. पकी २ हजार २८८, तर ३४३ मिनी अंगणवाडय़ा कार्यरत आहेत. एकूण २ हजार ६३१ महिला अंगणवाडी कर्मचारी आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे, मानधनाऐवजी वेतन द्यावे यांसह विविध मागण्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही शासनदरबारी दखल घेतली जात नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ६ जानेवारीपासून संप पुकारला आहे.
मंगळवारी जिल्हय़ातील अडीच हजार महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम केला. अंगणवाडीमार्फत दिला जाणारा पोषण आहार संपामुळे बंद आहे. स्तनदा, गरोदर माता यांची विशेष काळजी घेण्याचे कामही संपामुळे रखडले आहे. विशेष कुपोषित बालकांसाठी असलेले उपक्रमही बंद आहेत.

Story img Loader