दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो. आपल्यासमोर नेहमी चांगले आदर्श ठेवा व त्या आदर्शापेक्षाही चांगले काम करा. भरपूर अवांतर वाचन करा. वाचनाने मनुष्य प्रगल्भ होतो. चांगले विचार करण्याची प्रवृत्ती वाचनातून निर्माण होत असते, असे प्रतिपादन डी. जी. कुलकर्णी यांनी केले.
सिन्नर येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित गुरुवर्य कै. र. त्र्यं. भार्गवे पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
प्रास्ताविक प्राचार्य प्र. ला. ठोके यांनी केले. पुरस्कारप्राप्त विद्यार्थी महेश चव्हाण, हर्षदा महाजन, संकेत धनराव यांनी मनोगत व्यक्त केले. गो. स. व्यवहारे यांनी भार्गवे यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
वर्षांपासून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील शिक्षकांसाठी गुरुवर्य कै. र. त्र्यं. भार्गवे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावा यासाठी संस्थेचे खजिनदार म. का. शिंदे यांच्याकडे पाच हजार रुपयांची देणगी व्यवहारे यांनी सुपूर्द केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा