सध्याचा विद्यार्थी हा खूप प्रगल्भ आहे, त्यामुळे त्याने स्वत:ची क्षमता ओळखत आवडणाऱ्या क्षेत्रातच आपले भविष्य घडवावे आणि तेही त्या क्षेत्राचे थेट नेतृत्व करण्याइतपत यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा आमदार मंगेश सांगळे यांनी विक्रोळी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या.
विक्रोळी येथील विकास हायस्कूलमध्ये ‘लोकसत्ता यशस्वी भव मार्गदर्शन शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. विक्रोळी-कांजूरमार्ग विभागातील विद्यार्थ्यांसाठी मंगेश सांगळे यांच्यातर्फे ‘लोकसत्ता यशस्वी भव’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमास विद्या विकास संस्थेच्या मुख्य अधिकारी विद्या राऊत, विकास करिअर कॉलेजचे प्रमुख विकास राऊत व उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक तिवारी, तर अध्यक्षस्थानी ‘लोकसत्ता’चे विशेष प्रतिनिधी संदीप आचार्य उपस्थित होते. संदीप आचार्य यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’चे तज्ज्ञ शिक्षक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते यशस्वी भव पुस्तके प्रदान केली. कार्यक्रमाचे नियोजन वाघमारे यांनी केले, तर सूत्रसंचालन जया देशमुख यांनी केले.
विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात नेतृत्व करण्याइतपत यशस्वी व्हावे – मंगेश सांगळे
सध्याचा विद्यार्थी हा खूप प्रगल्भ आहे, त्यामुळे त्याने स्वत:ची क्षमता ओळखत आवडणाऱ्या क्षेत्रातच आपले भविष्य घडवावे आणि तेही त्या क्षेत्राचे थेट नेतृत्व करण्याइतपत यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा आमदार मंगेश सांगळे यांनी विक्रोळी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या.
First published on: 22-01-2013 at 11:26 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student should select their interested field to success