शहरातील उन्नती प्राथमिक विद्यालयात गोपाळकाला उत्साहात झाला. मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. गोविंदा आला रे आला, राधे कृष्ण गोपाळ कृष्ण, गोविंदा रे गोपाला, कृष्ण वंदे जगद्गुरू  अशा घोषणा देऊन गोपाळकाला कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधेच्या वेशभूषेत दहीहंडीभोवती रिंगण करीत आनंद लुटला. लहानसा मनोरा करून बालश्रीकृष्णाने दहीहंडी फोडली. कार्यक्रमास सांस्कृतिक प्रमुख अश्विनी अहिरे, रत्नाकर अलई, शोभा रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. अलई यांनी बालकृष्णाची गोष्ट सांगितली.

Story img Loader