शेगाव येथील माऊली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये वर्ग प्रतिनिधी विद्यार्थ्यांमधून विद्यापीठ प्रतिनिधीपदी मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या अभिजित मारोडे, गॅदरिंग सेक्रेटरीपदी प्रियंका महादुले, तसेच इव्हेन्ट सेक्रेेटरीपदी कॉम्युटर सायन्सच्या नेहा तळनीकर यांची एकमताने निवड झाली. विविध कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या ज्ञाना सोबतच विद्यार्थ्यांमधील व्यवस्थापन कौशल्यवाढीसाठी उपक्रम केले जात असल्याचे प्राचार्य जाधव यांनी सांगितले. विद्यार्थी निवड करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेस प्रा. काकड, प्रा. राजपूत, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मयुरी भांबेरे, धनश्री हिरूळकर, प्रियंका महादुले, साकेत पोंक्षे, पल्लवी दांडगे, स्वाती जाधव, छाया पाटील, अभिजित मारोडे, अरपितसिंग सांधु, नेहा तळनीकर, स्वाती उमाळे, गुणवंत वर्मा, राधा मुंढे इत्यादी वर्ग प्रतिनिधीची उपस्थिती होती. या विद्यार्थ्यांनी एकमताने प्रतिनिधींची नावे सुचविल्यावर  प्राचार्य डॉ.सी.एम.जाधव यांनी विद्यार्थ्यांची निवड करून अभिनंदन केले.

Story img Loader