उत्तराखंडमधील महाप्रलयात सर्वस्व गमावलेल्यांना मदतीचा हात म्हणून ‘द इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहा’ने स्थापन केलेल्या ‘एक्स्प्रेस सिटिझन्स रिलीफ फंडा’साठी लालबाग येथील ‘गुरुकुल चिल्ड्रन स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी आपलाही खारीचा वाटा उचलला आहे.
या संस्थेतर्फे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनातून जमा झालेला १९,१८६ रुपयांचा निधी या फंडाला मदत म्हणून देण्यात येणार आहे. उत्तरखंडमधील आपत्तीग्रस्तांसाठी मदतीच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘गुरुकुल’ने लालबाग येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते. १० ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रदर्शनाला अनेक रसिकांनी भेट दिली. या प्रदर्शनात प्रशंसा हडकर, पूजा शिंदे, वैदेही सावंत, वेदिका भोसले, रुचिता ब्रीद, प्राची पवार, शीतल मोरे, सायली सावंत, निरव कदम, रौनक तावडे, इशा खंडागळे, अथर्व दुकरूळ, श्रेया जाधव, अविश नार्वेकर, प्रथमेश पाटील, मयुर गावकर, ऐश्वर्या चव्हाण, शरयु नर, आदिती दातेकर हे विद्यार्थी चित्रकार सहभागी झाले होते.

Story img Loader