नवी मुंबई विभागाच्या मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने तीनदिवसीय विज्ञान आणि गणिताची कार्यशाळा सानपाडा येथील विवेकांनद संकुलात नुकतीच आयोजित करण्यात आली. विज्ञान प्रयोग कार्यशाळेत शालेय अभ्यासक्रमावर आधारित पण दैनंदिन जीवनात या तत्त्वांचा कोठे उपयोग होतो हे दाखवणारे ३० प्रयोग मुलांना करावयास दिले होते. हवेचा दाब, न्यूटनचे गतीविषयक नियम, घनता, ध्वनीची पट्टी, रसायन विज्ञान या विषयांवर आधारित प्रयोग मांडलेले होते. तसेच खेळण्यामागील विज्ञान या कार्यक्रमात मुलांना खेळणी तयार करायला शिकवले. खेळणी तयार करताना त्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे गुणधर्म लक्षात घेतानाच आपल्याला हवा तो परिणाम साधण्यासाठी साहित्याची मांडणी कशी करावी हे मुलांना शिकवण्यात आले.
गणिताची कार्यशाळामध्ये गणित हा कठीण विषय नसून सोपा आहे. ती एक पद्धत आहे. ती जर आत्मसात केली तर गणित आनंददायी आहे हे मुलांनी या कार्यशाळेत अनुभवले. गणितातली कोडी, सूत्र शोधणे, रामनुजनचा जादूचा चौरस, स्वत: गणित कोंडी तयार करणे इत्यादी गोष्टीमध्ये मुले रमून गेली. या कार्यशाळेत नवी मुंबई, ठाणे, रायगड, विरार, डोंबिवली, पनवेल आदी उपनगरांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान प्रयोगाचे धडे
नवी मुंबई विभागाच्या मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने तीनदिवसीय विज्ञान आणि गणिताची कार्यशाळा सानपाडा येथील विवेकांनद संकुलात नुकतीच आयोजित करण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-05-2015 at 09:03 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students maths science