विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी, पृथ्वी व इतर ग्रहांची त्यांना माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना विविध शास्त्रीय उपकरणे तयार करता यावीत, यासाठी येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने खगोलशास्त्रविषयक कार्यशाळा घेण्यात आली.
खगोलशास्त्राची महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून करून देण्यात आली. ग्रीक शास्त्रज्ञ इरॅस्थोथेनीस यांनी २२०० वर्षांपूर्वी पृथ्वीचा परीघ ज्या पद्धतीने मोजला होता, त्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना परीघ मोजण्याचे शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या पद्धतीने पृथ्वीचा परीघ स्वत: मोजून बघितला. विद्यार्थ्यांना दुर्बीणद्वारे सूर्याच्या पृष्ठभागावर दिसणारा काळा डाग बघण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना अग्निबाण (रॉकेट) कसे तयार करायचे, अग्निबाणाच्या साहाय्याने यानाचे प्रक्षेपण करण्याचे शास्त्र विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. रिकाम्या बाटल्यांद्वारे अग्निबाण तयार करून ते जेव्हा आकाशात सोडण्यात आले तेव्हा विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हे प्रात्यक्षिक सर्व टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आले होते. आकाशातील ताऱ्यांचे सूक्ष्मवलोकन दुर्बीणद्वारे करण्यात आले. आकाशाचे सूक्ष्मवलोकन करताना ताऱ्यांचे मोजमाप, विविध प्रकारे वर्गीकरण, विशेष स्थान, तसेच अग्रणीत ताऱ्यांचे प्रत्यक्ष दर्शन प्रत्यक्ष दुर्बीणद्वारे दाखविण्यात आले.
आकाशातील चंद्र, शनी, मंगळ, गुरू, बुध इत्यादी ग्रह बघताना स्कूल विद्यार्थी व पालक हे पूर्णपणे खगोलशास्त्रात बुडून गेले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा