अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांच्या विषय समिती सदस्यांची निवड करण्यासाठी शुक्रवार १७ मे रोजी पालिकांच्या विशेष सभा जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांनी जाहीर केल्या आहेत.
स्थायी समिती तसेच विषय समिती सदस्यांची संख्या निश्चित करणे, उपाध्यक्ष कोणत्या समितीचे पदसिद्ध सभापती असतील ते ठरविणे, विषय समिती सदस्यांचे नामनिर्देशन करून त्यांची नावे जाहीर करणे तसेच स्थायी समितीची रचना व सदस्यांची नावे जाहीर करणे हे विषय विशेष सभेपुढे असणार आहेत.
अंबरनाथच्या सभेत उल्हासनगरचे तहसीलदार अमित सानप तर बदलापूर येथील सभेस अंबरनाथचे तहसीलदार बाळासाहेब खांडेकर पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. पूर्वी विषय सदस्य आणि सभापतींची निवड एकाच दिवशी होत होती. आता सभापतींची निवडणूक काही दिवसांनी होते. त्यामुळे सभापतीपदासाठी अवधी कमी मिळतोच, शिवाय घोडेबाजाराला संधी मिळते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे एकाचवेळी ही प्रक्रिया व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
विषय समिती सदस्य निवडीसाठी अंबरनाथ-बदलापूरमध्ये
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांच्या विषय समिती सदस्यांची निवड करण्यासाठी शुक्रवार १७ मे रोजी पालिकांच्या विशेष सभा जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांनी जाहीर केल्या आहेत.
First published on: 15-05-2013 at 12:35 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subject committee in ambarnath badlapur for members selection