‘मेडिकल पॅ्रक्टिशनर्स’ अध्यक्षपदी डॉ. दीपक सोनवणी

नाशिक येथे झालेल्या वैद्यकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाराष्ट्र मेडिकल पॅ्रक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. दीपक सोनवणी यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष डॉ. दिगंबर शिरूडे यांच्या वतीने डॉ. सोनवणी यांचे नाव सुचविण्यात आले. संस्था राज्यस्तरावर काम करणार असून दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे शिरूडे यांनी सांगितले.
योगेश आव्हाड यांची निवड
नाशिक येथे अखिल भारतीय काँग्रेस समिती प्रणीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय फेरीवाला संघटनेच्या जिल्हा शाखेची बैठक संस्थापक अशोक सानप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत नाशिक तालुका अध्यक्षपदी योगेश आव्हाड यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी रितेश डोईफोडे, सरचिटणीसपदी विलास कोथमिरे, तालुका संघटक विनायक गोसावी, कोशाध्यक्ष उत्तम पाटील, प्रवक्तेपदी   विश्वास    मराठे    यांची    निवड  करण्यात आली. प्रास्ताविकात राजेंद्र वारे यांनी राष्ट्रीय फेरीवाला संघटनेची ध्येयधोरणे व उद्देशांविषयी माहिती दिली.
‘भाजयुमो’ कार्यकारिणी जाहीर
नाशिक शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी गिरीश पालवे यांची निवड झाली आहे.
उपाध्यक्ष म्हणून साहेबराव गाडे, संजय शिरसाठ, दिनेश देवरे, अमोल पाटील, सचिन गायकवाड, विजय चव्हाण, सरचिटणीस म्हणून सचिन हांडगे, व्हिनस वाणी व    चिटणीसपदी     सोमनाथ    बोडके,   संतोष बोराडे,    सचिन   चव्हाण,    प्रसाद    महाले,   मंगेश रोजेकर,   अनिल    काकड    आदींचा  समावेश आहे.

Story img Loader