राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही सहकारी साखर कारखान्यांची देशपातळीवरील प्रातिनिधिक संस्था असून या सुवर्णमहोत्सवी महासंघाच्या अध्यक्षपदाची धुरा कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी व पारदर्शी नेतृत्वाकडे आल्यामुळे देशातील साखर उद्योगाला त्याचा निश्चित उपयोग होईल, असे उद्गार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या सत्कारप्रसंगी काढले.
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी आवाडे यांची, तर उपाध्यक्षपदी अमित कोरे यांची एकमताने निवड झाली. या निवडीनंतर आवाडे यांनी पवार आणि सुशीलकुमार िशदे या मंत्रीमहोदयांची भेट घेतली. या वेळी त्यांचेबरोबर स्वप्निल आवाडे, जवाहर कारखान्याचे व्हा. चेअरमन विलास गाताडे, संचालक बाबासो चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी तसेच कल्लाप्पाण्णा आवाडे इचल. जनता सह. बँकेचे संचालक राजू पाटील हे उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबाची पाश्र्वभूमी लाभलेल्या आuवाडे यांना जवाहर कारखान्याच्या उभारणीपासून जवळजवळ २० वर्षे आणि त्याही पूर्वी दत्त साखर कारखान्याच्या संचालकपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. हा अनुभव राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या अध्यक्षपदासाठी निश्चित लाभदायक होणार आहे. साखर उद्योगापुढील आयकर, नियंत्रणमुक्ती यासारखे जटिल प्रश्न आ वासून उभे आहेत. त्यामुळे नॅशनल फेडरेशनच्या अध्यक्षपदी झालेल्या आवाडे यांच्या निवडीमुळे असे प्रश्न मार्गी लागण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास मंत्री सुशीलकुमार िशदे यांनी व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.