महाविद्यालयीन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सोनवणे
जिल्हा महाविद्यालयीन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. सी. डी. सोनवणे, उपाध्यक्षपदी प्रा. नंदकुमार काळे तर सचिवपदी प्रभावती पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रा. डॉ. मदन मत्सागर, उपाध्यक्ष सूर्यभान गायधनी यांनी आभार मानले.

अस्मिता दुधारेची निवड
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनायाव्दारे लातूर येथे आयोजित शालेय राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाची खेळाडू अस्मिता दुधारे हिने इपी वैयक्तिक व सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकाविले. तिची निवड जळगाव येथे १० ते १३ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या १९ वर्षांआतील शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. गतवर्षी चंदीगड येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकाविले होते. तर त्या आधी संगमनेर येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्य असे तीन पदक पटकाविले होते. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षण शिबीर पाच जानेवारीपासून जळगाव येथे सुरू होत आहे. अस्मिताला प्रा. कैलास लवांड यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. योगेश अलई ‘समाजश्री’
सिडको येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. योगेश अलई खर्डेकर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय ‘समाज श्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. अलई यांना यापूर्वी सामाजिक क्षेत्रातील १८ पुरस्कार मिळाले आहेत.
 डॉ.  योगेश खर्डेकर त्यांनी २० वेळा रक्तदान केले आहे. तसेच त्यांनी नेत्रदानाचाही संकल्प केला आहे.

प्रियांगी गोसावीचे यश
नाशिक येथील एसएमआरके महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रियांगी गोसावी ही एम.ए. (संगीत) मध्ये विशेष प्राविण्य संपादन करून एसएनडीटी महिला विद्यापीठात सर्वप्रथम आली. गोसावी यांना सुवर्णपदकासह सहा अन्य पुरस्कारांनी दीक्षान्त सोहळ्यात कुलगुरू प्रा. वसुधा कामत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना अविराज तायडे, मकरंद हिंगणे, निलम बोकील यांचे मार्गदर्शन लाभले.

Story img Loader