सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंद्रेश्वर साखर कारखान्याकडून होणारी ऊसतोड बार्शी तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंद पाडली. तीन हजार रुपयांचा उसाचा पहिला हप्ता मिळावा, अशी आदोलकांची मागणी आहे. ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत उसाला कोयता लावू देणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी अध्यक्षा असलेला इंद्रेश्वर साखर कारखाना बार्शी तालुक्यात उभारण्यात आला आहे. परंतु ऊसदर प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पेटविले आहे. तीन हजार रुपये पहिला हप्ता राज्य शासनाने जाहीर करावा, असा शेतकरी संघटनांचा आग्रह आहे. त्यामुळे यात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भूमिका महत्त्वाची असताना त्यांचाही साखर कारखाना उसाला तीन हजार रुपयांचा पहिला हत्पा जाहीर करीत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे.
या प्रश्नावर संघटनेचे बार्शी तालुक्यातील कार्यकत्रे अशोक जाधव, गोवर्धन पाटील, सुभाष जाधव, पोपट जाधव, शिवाजी घोडके व इतरांनी सहकारमंत्र्यांच्या उपळाई ठोंगे येथील इंद्रेश्वर साखर कारखान्यास सुरू होणारी ऊसतोड सविनय कायदेभंग करून रोखून धरली आहे. जवळगाव (ज्योतिबाची वाडी) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल डिसले यांच्या शेतात होणारी ऊसतोड स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंद पाडून ऊस दरवाढीच्या आंदोलनाचे रणिशग फुंकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा