कागल येथील श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुसानिमित्त गहिनीनाथ कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने तीन गटांत ऊस पीक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत आडसाली ऊस गटात प्रवीण दादासाहेब चौगुले (व्हन्नूर), पूर्व हंगामी ऊस गटात आनंदराव पाटील (मौजे सांगाव), तर खोडवा ऊस गटात आनंदा पसारे (कागल) यांच्या उसाने प्रथम क्रमांक पटकाविला.
कृषी प्रदर्शनात घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण नगराध्यक्ष माधुरी नाळे, कृषी उपसंचालिका (आत्मा) भाग्यश्री पोवार, तालुका कृषी अधिकारी अशोक पाटील, स्पर्धेचे संयोजक रमेश माळी, भैया माने आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी रमेश माळी म्हणाले, शेतकऱ्यांना दर्जेदार ऊसपिकाची माहिती व्हावी, ऊसउत्पादन खर्चात बचत करण्यासाठी िठबक सिंचनचा वापर करणे अशा स्पर्धेतून शेतकऱ्यांपर्यंत चांगला संदेश दिला जातो. भैया माने यांनी उद्दिष्ट ठेवून शेती करावी, ऊस उत्पादनात वाढ कशी करता येईल याचे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा ऊसपीक स्पर्धा आवश्यक असल्याचे सांगितले. या वेळी भाग्यश्री पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक मंडल कृषी अधिकारी विजय माळी यांनी केले. स्पर्धेतील इतर गटांतील निकाल आडसाली गट (उत्कृष्ट) प्रवीण दादासाहेब चौगुले (व्हन्नूर), शिवाजी तुकाराम मगदूम (बामणी); प्रकाश सुबाराव चव्हाण (कागले), दत्तात्रय शिवाजी गोरे (कागल), अप्पासाहेब पांडुरंग पाटील (मौजे सांगाव), शिवराज बाबासाहेब पाटील (मौजे सांगाव). उत्तेजनार्थ- रमेश बजरंग मांडवकर (कागल), अजित बाबासाहेब पाटील (सुळकूड), मानसिंग कृष्णा माने (कागल), रणजित शिवगोंडा पाटील (कागल), सुरेश रामचंद्र माळी (कागल). पूर्व हंगाम गट- आनंदराव पांडुरंग पाटील (मौजे सांगाव)- प्रथम, मारुती अप्पा टेळे (सुळकूड)- द्वितीय, महादेव सिद्धू परीट (सुळकूड)- तृतीय.उत्तेजनार्थ – प्रताप यशवंतराव माने (कागल), शंकर वीरगोंडा टेळे (सुळकूड). खोडवा गट- आनंदा शिवाजी पसारे (कागल)- प्रथम, धोंडिराम खतगोंडा कतगर (सुळकूड)- द्वितीय, संजय कृष्णात कदम (कागल)- द्वितीय, पूजा प्रकाश मगदूम (मौजे सांगाव)- तृतीय. उत्तेजनार्थ- नरसिंगा दत्तू मगदूम (िपपळगाव). प्रगतशील युवा शेतकरी सौरभ पाटील (कागल), रोहित रमेश माळी (कागल), नवाज अन्वर मुश्रीफ (कागल).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा