कोल्हापूरचे अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय पवार यांनी कलम १४४ अन्वये १४ ते ३० नोव्हेंबरअखेर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना परिसरापासून १०० मीटरच्या अंतरापर्यंत आंदोलन करणे, मोर्चा काढणे, रॅली काढणे, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड करणे, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनातील हवा सोडणे इत्यादी कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ११ नोव्हेंबर २०१२ पासून स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटना यांच्या वतीने चालू हंगामात उसाला प्रतिटन ३००० रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे तसेच गेल्या गळीत हंगामातील अंतिम बिल मिळाल्याशिवाय साखर कारखाने चालू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली असून या संघटनेचे कार्यकत्रे जिल्ह्यामध्ये ऊसतोड रोखणे, ऊस वाहतूक रोखणे, वाहनांची हवा सोडणे.
अचानक रास्ता रोको करून जाळपोळ करणे अशा प्रकारची आंदोलने करीत असून सध्या या आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे. आंदोलक व कारखानदार यांच्यातही असंतोष निर्माण झालेला आहे.
या आंदोलनातील लोकांकडून सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सद्य:स्थितीत आंदोलक हे िहसक झाले असून वाहनांची जाळपोळ, कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, कार्यालयातील साहित्याची मोडतोड करून किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याची खात्री झाल्याने साखर कारखाना परिसरात आंदोलन करण्यास मनाई केली आहे.   

Story img Loader