सततची नापिकी व यंदा पडलेला ओला दुष्काळ यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेल्या दत्ता जाधव (वय २८) या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. किनवट तालुक्यातील मांडवी येथे दत्ता जाधव उदरनिर्वाहासाठी शेती करीत होता. त्याच्या डोक्यावर ५० हजारांचे कर्ज झाले होते. सततची नापिकी व यंदाचा दुष्काळ त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत तो गेल्या अनेक दिवसांपासून होता. यातूनच त्याने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेतला. मांडवी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Story img Loader