इचलकरंजी येथील कारखानदाराच्या उच्च शिक्षित मुलाने शनिवारी सकाळी आत्महत्या केली. अभिजीत कुबेर चौगुले (वय २५) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.    कुबेर चौगुले हे तांबेमळा भागात राहतात. तेथे त्यांचा यंत्रमागाचा कारखाना आहे. तसेच नाईकमळ्यातही त्यांनी एक कारखाना चालविण्यासाठी घेतला आहे. त्यांचा मुलगा अभिजीत हा अविवाहित होता. त्याने एमबीए पर्यंतचे शिक्षण घेतले होते. काल रात्री अभिजीत नाईक मळ्यातील कारखान्यात जाऊन आल्यानंतर मित्रांशी गप्पा मारीत होता. उच्चशिक्षित व घरची स्थिती सधन असतानाही त्याला उच्चभ्रू पध्दतीचे जीवन जगणे, धार्मिक स्तोम माजविणे त्याला पसंत नव्हते. सकाळी सहा वाजता तो यंत्रमागाच्या कारखान्यात गेला. तेथे असलेल्या कार्यालयात दोरीने गळपास लावून त्याने आत्महत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा