गावातील युवकांच्या छेडछाडीमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून वखारी (तालुका जालना) येथील सुलोचना वैजनाथ घुले (वय १७) या मुलीने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.
मुलीचे वडील वैजनाथ घुले यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार गणेश जनार्दन खैरे याच्यासह अन्य पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. आरोपी या मुलीची मोबाईलवर संपर्क करून छेड काढत असत. यापैकी एकाने काही दिवसांपूर्वी धुणे धुण्यास जातानाही छेड काढली होती. हा प्रकार तिने भावास सांगितल्याने वाद झाला होता. त्यानंतर मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तालुका जालना पोलिसांनी गणेश खैरे यास अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा