सासरी पती व सासूकडून सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे वैतागून विवाहितेने स्वत: रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची घटना शहरातील हैदराबाद रस्त्यावर विडी घरकुलात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पती व सासूविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
बीना विठ्ठल शिंदे (वय २७) असे दुर्दैवी मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. परंतु पती विठ्ठल व सासू गौराबाई शिंदे यांच्याकडून तिचा सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे छळ होत असे. सासूच्या चिथावणीने पतीकडून तिला बेदम मारहाण केली जात असे. शारीरिक व मानसिक छळ सहन करीत सासरी कसेबसे नांदत असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून मात्र पती व सासू बीनाच्या चारित्र्यावर नव्याने संशय घेऊन छळ चालविल्याने ती वैतागली. त्यातूनच तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला. जोडभावी पेठ पोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पती व सासूच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या
सासरी पती व सासूकडून सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे वैतागून विवाहितेने स्वत: रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची घटना शहरातील हैदराबाद रस्त्यावर विडी घरकुलात घडली.
First published on: 25-06-2013 at 01:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of married women due to harassment of husband and mother in law