शहरातील अक्कलकोट रस्त्यावर सोलापूर सहकारी सूतगिरणीजवळ एका मातेने आपल्या मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेमागचे निश्चित कारण लगेचच स्पष्ट होऊ शकले नाही.
शाकिरा महिबूब शेख (वय ४०, रा. कीर्तिनगर, अक्कलकोट रस्ता) व तिची मुलगी काजल (वय ९) अशी दोघा मृत मायलेकीची नावे आहेत. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. मृत शाकिरा हिने घरात भांडण काढून मुलगी काजल हिला घेऊन जवळच्या पडगाजीनगरातील विहिरीवर आली. त्यावेळी मन:स्ताप होऊन शाकिरा हिने मुलगी काजल हिला विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु ती निसटून पळत सुटली. त्यावेळी घडलेला प्रकार पाहून आसपासची मंडळी जमली. सर्वानी शाकिरा हिची समजूत काढून तिच्याजवळ मुलगी काजल हिला परत आणून सोडले. मात्र शाकिरा हिने पुन्हा दुसऱ्यांदा मुलीला विहिरीत ढकलून दिले. नंतर स्वत:ही उडी मारली. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी विहिरीतून मायलेकीचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Story img Loader