शहरातील केटीएचएम महाविद्यालयाच्या कनिष्ठ विज्ञान विभागातील विद्यार्थी सुजय जाधव हा जेईई मुख्य २०१४ परीक्षेत २८२ गुण मिळवून जिल्ह्य़ात प्रथम आला. नियमित अभ्यास आणि शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे हे यश मिळविता आल्याची प्रतिक्रिया सुजयने दिली आहे. सुजयने आता जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी सुरू केली आहे. त्याला विज्ञान शाखेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Story img Loader