दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा काँग्रेसची (ग्रामीण) तब्बल १०५ जणांचा समावेश असेलली ‘अतिविशाल’ कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत ७ उपाध्यक्ष, ११ सरचिटणीस, १५ चिटणीस, १ खजिनदार, ४३ कार्यकारिणी सदस्य व २७ विशेष निमंत्रितांचा समावेश आहे. कार्यकारिणीत  विखे गटास झुकते माप दिले गेले आहे. त्यामुळे थोरात गटात नाराजीचे वातावरण आहे.
वर्षभर वाट पाहून जाहीर केलेल्या यादीत तेच-तेच चेहरे आहेत, नवीन चेहऱ्यांना स्थान दिले गेले नाही, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी जिल्हा दौरा करून, बैठका घेऊन नवे चेहरे पक्षाशी जोडणे अपेक्षित होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याचाही आक्षेप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नगर शहर संघटनेस स्वतंत्र जिल्हा दर्जा असतानाही, शहरातील ५ जणांना ग्रामीण संघटनेच्या कार्यकारिणीत स्थान दिले गेले आहे, हे चुकीचे असल्याचे मत काही जण व्यक्त करतात. शहर जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले प्रा. श्रीकांत बेडेकर व उबेद शेख यांना ग्रामीणमध्ये स्थान दिले गेल्याने ते शर्यतीतून आपोपच बाद झाल्याकडेही पक्षात लक्ष वेधले जात आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सूचनेनुसार व प्रदेश सरचिणीस गणेश पाटील यांच्या सहीने ही यादी जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी आज जाहीर केली. पाथर्डीचे तालुकाध्यक्ष मिठुभाई शेख यांना जिल्हा चिटणीसपद दिल्याने तालुकाध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा आहे. ७ उपाध्यक्षांपैकी थोरात गटास केवळ १, ११ सरचिटणिसांमध्ये केवळ ५, १५ चिटणिसांपैकी थोरात गटाचे केवळ ५ जण आहेत. कार्यकारिणीत केवळ ५ महिलांचा समावेश आहे.
कार्यकारिणी अशी: उपाध्यक्ष- प्रा. तुकाराम दरेकर, सुभाष गुंदेचा, गुलाबराव शेवाळे, आण्णासाहेब शेलार, विक्रम देशमुख, अशोकराव देशमुख,जलीललखाँ पठाण. सरचिटणीस- राजेंद्र नागवडे, उबेद शेख, बाळासाहेब हराळ, संभाजी रोहकले, सतीश कानवडे, रावसाहेब शेळके, अरुण नाईक, प्रा. ज्ञानेश्वर शेळके, पांडुरुंग खेडकर, प्रताप शेळके, श्रीमती सुहासिनी ओमप्रकाश कोयटे. चिटणीस-  मिठुभाई शेख, सुधाकर कांबळे, रवींद्र मासाळ, राहुल शिंदे, अंकुशराव कांगुणे, बाळासाहेब गिरमकर, पाटीलबा सावंत, अरविंद आठरे, अशोक बागुल, डॉ. जयंत कुलकर्णी, तुषार पवार, अॅड. माणिकराव मोरे, आशा बाळासाहेब मुरकुटे, नंदा ठवाळ, वर्षां कैलास माने. खजिनदार- सुधीर रामदास धुमाळ.
याशिवाय ४३ सदस्यांसह जिल्ह्य़ातील दोन्ही मंत्री, विद्यमान आमदार, माजी खासदार व आमदार, माजी जि.प. अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, रामदास धुमाळ, सुभाष पाटील, वसंतराव कापरे, भास्करराव डिक्कर, अरविंद काळोखे, प्रेमानंद रूपवते, श्रीकांत बेडेकर, डी. एम. कांबळे, ओमप्रकाश ऊर्फ काका कोयटे, राजेश परजणे, रावसाहेब साबळे, बन्सीभाऊ म्हस्के, बापुसाहेब देशमुख यांचा विशेष निमंत्रितांत समावेश आहे.
जि.प.मधील पक्षाच्या गटनेत्यासही कार्यकारिणीत स्थान आहे, मात्र हा गटनेताच पक्षाने नियुक्त केला नाही. पक्षाच्या विविध आघाडय़ांचे जिल्हाध्यक्षही विशेष निमंत्रित आहेत.