आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना यापुढे शाळेतच अंधश्रद्धेबाबत माहिती देण्यात येणार असून राज्य शासन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) ही मोहीम हाती घेतली आहे. आदिवासींच्या शोषणाचे महत्त्वाचे कारण त्यांच्यातील अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे याबाबत शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहाय्याने मोहीम आखली आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्रालय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या मोहिमेनुसार आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेतील एका शिक्षक व शिक्षिकेला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम डिसेंबर-जानेवारी महिन्यात नंदुरबार जिल्ह्य़ात राबवण्यात येणार आहे. आदिवासींमधील डाकीण, भुताळी यांसारख्या प्रथा दोन वर्षांत नष्ट करण्याचा निर्धार फेब्रुवारी २०१३ मध्ये एक परिषद घेऊन करण्यात येणार आहे.
आदिवासी आश्रमशाळांमध्ये अंधश्रद्धा जागृती मोहीम
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना यापुढे शाळेतच अंधश्रद्धेबाबत माहिती देण्यात येणार असून राज्य शासन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) ही मोहीम हाती घेतली आहे. आदिवासींच्या शोषणाचे महत्त्वाचे कारण त्यांच्यातील अंधश्रद्धा आहेत.
आणखी वाचा
First published on: 27-11-2012 at 02:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superstitions jagruti in backward hermitage