‘चोसाका’चे सभासद, ऊस उत्पादक, कामगार व संचालकांबरोबरच  स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखाना टिकवावा, असे आवाहन बुलढाणा अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश झंवर यांनी केले. चोसाका संचालक मंडळाचा कारभार पारदर्शी असल्यामुळे बुलढाणा बँक सदैव चोसाकाच्या मागे उभी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
चोपडा साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन सोहळा भानुदास पाटील व इंदिराताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अध्यक्षीय भाषणात झंवर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. डॉ. सुरेश पाटील, आ. जगदीश वळवी, माजी शिक्षक दिलीप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना चोसाकाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी कारखाना अडचणीतून मार्ग काढत असल्याचे सांगितले. कारखान्याला आर्थिक अडचण असताना शेतकरी बांधवांनी मदत व्हावी म्हणून बुलढाणा अर्बन बँकेने अर्थसाहाय्य केले. जिल्हा बँकेने आर्थिक साहाय्य न केल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी त्यामुळे दूर होऊ शकल्या. बुलढाणा बँकेच्या सहकार्यामुळे कारखाना चालण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी चोसाकाचे सर्व संचालक उपस्थित होते.
मागील गळीत हंगामातील उसाला २५० रुपये प्रति. मेट्रिक टनाचा अंतिम दर दिला जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. १० कोटी रुपये कर्जाची मागणी बुलढाणा अर्बनकडे करण्यात आली असून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळताच ऊस उत्पादकांना देयक दिले जाईल. सध्याच्या हंगामात खान्देशातील कारखाने जो दर ऊसाला देतील, तो दर चोसाका देईल. या वेळी काही शेतकऱ्यांनी भावासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा