अंधश्रद्धांच्या विरोधात लढा देणे, समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणे, हे तर संतकार्यच आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याला आमचा जाहीर पाठिंबा असल्याची स्पष्ट भूमिका ७०० वर्षांपासून कार्तिकी वारीची परंपरा असलेल्या संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या दिंडीने घेतली आहे. खरा वारकरी या कायद्यास विरोध कधीच करणार नाही, असे मत पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केले.
जागतिक व्यापारपेठेचे केंद्रस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथून गोरोबाकाकांचा पालखी सोहळा दरवर्षी काíतकी वारीसाठी पंढरीला जातो. या वारीला ७०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा लाभली आहे. बाराव्या शतकात संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांच्या भेटीसाठी ज्ञानेश्वरमाऊली संतमेळ्यासह तेर येथे आले होते. अध्यात्म, ज्ञान व समाजप्रबोधनाची प्राचीन परंपरा असलेल्या तेरच्या पालखी सोहळ्याने जादूटोणा विरोधी कायद्याला जाहीर पािठबा दिला. देवाच्या नावाने श्रद्धेचा बाजार करणाऱ्या देवॠषींची जागा कारागृहातच असायला हवी, अशी परखड भूमिका दिंडी सोहळ्यातील वीणेचे मुख्य मानकरी नामदेव अंबऋषी थोडसरे यांनी मांडली, तर दिंडी सोहळ्याचे व्यवस्थापक श्रीहरी बंडू थोडसरे यांनी संत-महंतांनी हेच काम केले आहे. त्यामुळे यापुढील काळात संतांचे विचार पुढे नेण्याचे काम हा कायदा करील, असा विश्वास व्यक्त केला. दिंडी सोहळ्याचे चोपदार केशव मुळे व उत्तम घोडके यांनीही खरा वारकरी या कायद्याला विरोध न करता त्याचा प्रचार करेल, असे मत नोंदविले.
दिंडी सोहळ्यातील रघुनंदनमहाराज पुजारी यांनीही राज्य सरकारने वारकऱ्यांनी नोंदविलेला आक्षेप वगळून आमचा सन्मान राखला. या कायद्याचा सन्मान सर्व वारकऱ्यांनी राखावा, असे आवाहन केले. उस्मानाबाद शहरातील जिजामाता उद्यानाजवळील मारुती मंदिरात बुधवारी गोरोबाकाकांच्या पालखीचा मुक्काम होता. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांना जादूटोणा विरोधी कायदा समज-गरसमज या विषयीच्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. वारकरी सांप्रदायाने या कायद्याला बळ द्यावे, असे आवाहन अंनिस उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे, प्रधान सचिव बालाजी तांबे यांनी या वेळी केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती देव, धर्म व उपासनेला विरोध करीत नाही. कायद्याने बहाल केलेल्या हक्कांचा सन्मान करते. संतांनी दिलेल्या शिकवणीच्या मार्गाने विवेकी समाज निर्मितीसाठी कार्यरत असते, अशी मांडणी एम. डी. देशमुख, भाग्यश्री वाघमारे, अॅड. देविदास वडगांवकर यांनी केली. िदडी सोहळ्यातील वारकरी बांधवांनी अंनिसच्या आवाहनाला प्रतिसाद देत जादूटोणा विरोधी कायद्याला आमचा जाहीर पािठबा असल्याचे या वेळी स्पष्ट केले. काíतकी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून हा कायदा सांगण्याचा मनोदयही वीणेचे मानकरी नामदेव थोडसरे यांनी व्यक्त केला. प्रा. रवी िनबाळकर, डॉ. सुभाष वाघ, सुजित ओव्हाळ, रवींद्र केसकर यांच्यासह अंनिसचे कार्यकत्रे उपस्थित होते.

Story img Loader