श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर झाला असून, येथील रामराव आदिक पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सूरज काळे याची कर्णधारपदी निवड झाली आहे. आज हा संघ रवाना झाला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आदिक पब्लिक स्कूलच्या प्रांगणात झालेल्या क्रिकेट स्पर्धेत राज्याचा संघ निवडण्यात आला. संघाला येथे प्रशिक्षण देण्यात आले. काळे यांच्या नेतृत्वाखालील संघात गणेश खरात, अमन मोखाडे, वेदान्त मुळे, आनंद जगताप, प्रीतेश सोनवणे, सुमेध मेश्राम, निनाद सावंत, अभिषेक पालकर, हृषीकेश जाधव, जीवन जाधव, रूपेश केदार, हेरंब पावस्कर, विश्वास वाघुले, शॉन रॉड्रिग्ज, रोहन थोरात यांचा समावेश असून, संघव्यवस्थापक भाऊराव वीर व टीम मार्गदर्शक सचिन मिलमिले हे आहेत.
संघाला शुभेच्छा समारंभात नुकताच निरोप देण्यात आला. या वेळी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष डॉ. सुनील कवडे, प्राचार्य प्रवीण कवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले, सुनील गावडे, व्ही. टी. गुंजाळ, ज्ञानेश्वर कुमावत, डॉ. वसंत देवकर, दत्तात्रय घोगरे, बी. डी. बनकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या कर्णधारपदी सूरज काळे
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर झाला असून, येथील रामराव आदिक पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सूरज काळे याची कर्णधारपदी निवड झाली आहे.
First published on: 27-09-2013 at 01:44 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj kale elected for captain of maharashtra