श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर झाला असून, येथील रामराव आदिक पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सूरज काळे याची कर्णधारपदी निवड झाली आहे. आज हा संघ रवाना झाला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आदिक पब्लिक स्कूलच्या प्रांगणात झालेल्या क्रिकेट स्पर्धेत राज्याचा संघ निवडण्यात आला. संघाला येथे प्रशिक्षण देण्यात आले. काळे यांच्या नेतृत्वाखालील संघात गणेश खरात, अमन मोखाडे, वेदान्त मुळे, आनंद जगताप, प्रीतेश सोनवणे, सुमेध मेश्राम, निनाद सावंत, अभिषेक पालकर, हृषीकेश जाधव, जीवन जाधव, रूपेश केदार, हेरंब पावस्कर, विश्वास वाघुले, शॉन रॉड्रिग्ज, रोहन थोरात यांचा समावेश असून, संघव्यवस्थापक भाऊराव वीर व टीम मार्गदर्शक सचिन मिलमिले हे आहेत.
संघाला शुभेच्छा समारंभात नुकताच निरोप देण्यात आला. या वेळी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष डॉ. सुनील कवडे, प्राचार्य प्रवीण कवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले, सुनील गावडे, व्ही. टी. गुंजाळ, ज्ञानेश्वर कुमावत, डॉ. वसंत देवकर, दत्तात्रय घोगरे, बी. डी. बनकर आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा