हिंगोली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार दोन वेळा विजयी झाला असल्याने हा मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच नाही. हिंगोलीतून राष्ट्रवादीच निवडणूक लढविणार असल्याचा दावा जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा पक्ष निरीक्षक सुरेश धस यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीकडून उमेदवार निवडीसाठी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्याच्या निमित्ताने मंत्री धस गुरुवारी हिंगोलीत आले होते. कार्यकर्त्यांच्या बठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, आमदार जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार शिवाजीराव माने, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जि.प. सदस्य केशव नाईक आदी उपस्थित होते.
सकाळी वसमत विश्रामगृहावर धस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बठक झाली. त्यानंतर दुपारी हिंगोलीत राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांची बठक घेण्यात आली. यापूर्वी दोन वेळा हिंगोलीतून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. (वास्तविक, एकदाच निवडून आला. सुरुवातीला सूर्यकांता पाटील काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या.) त्यामुळे ही जागा मित्रपक्ष काँग्रेसला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघ अदला-बदलीविषयी वरिष्ठ पातळीवर काय चालू आहे, याची अधिकृत माहिती अजून आमच्यापर्यंत आली नाही. आम्ही आमच्या पातळीवर पक्ष आदेशाप्रमाणे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी