आपल्या आत्मचरित्रातून युवकांना प्रोत्साहन देणारे पालिका कर्मचारी आणि लेखक सुरेश धोंडू गोपाळे यांचा बाजार आणि उद्यान समितीच्या पुढील बैठकीत प्रशासनातर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून पालिकेच्या सेवेत रुजू झालेले सुरेश धोंडू गोपाळे सध्या बाजार विभागात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. ‘एक पाखरू वेल्हाळ’ हे त्यांचे आत्मचरित्र अलीकडेच प्रकाशित झाले.   वेळप्रसंगी भिक्षा मागून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व ते पालिकेच्या सेवेत लागले. आपल्या आयुष्यातील चढ-उतार त्यांनी आत्मचरित्राद्वारे अभिव्यक्त केले आहेत. या आत्मचरित्राला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्याबद्दल पालिकेने त्यांचा सत्कार करावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी बुधवारी बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत केली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी या मागणीला एकमुखाने पाठिंबा दिला.

Story img Loader