जिल्हा परिषदेचे १ कोटी ४ लाख ६० हजार शिलकीच्या अंदाजपत्रकाला अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली.
जि.प.अध्यक्ष संतोष कुमरे यांच्या अध्यक्षतेखालील अर्थसंकल्पीय सभेत अर्थ व बांधकाम सभापती गुणवंत कारेकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. २०१२-१३ च्या सुधारित अंदाजपत्रकात जिल्हा निधी, जिल्हा परिषद सेस फंड व वन महसूल अनुदान मिळून गेल्या वर्षीच्या शिलकीसह २४ कोटी ९४ लाख ५७ हजार होते. शासनाकडून घेणे असलेल्या सेस फंडाचा व उपकार अनुदानाचा, तसेच वन व महसूल अनुदानाचा समावेश असून अंदाजपत्रकात २३ कोटी ८९ लाख ९७ हजार गृहीत धरून १ कोटी ४ लाख ६० हजाराचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.
ग्रामीण विभागातील मागासवर्गी लोकांच्या कल्याणासाठी सेस फंडातून २० टक्के निधी देण्याचे अनिवार्य केले आहे. महिला व ग्राम विकासाच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी १० टक्के म्हणजे एक कोटी आठ लाख ८० हजाराची तरतूद केली आहे, तसेच ग्रामीण भागात हातपंप व विहिरींची बहुतांश कामे हाती घेण्यात आली आहे. वसंत भवन वातानुकूलित करणे, रंगरंगोटीचे कामेही या वर्षी घेण्यात आली आहेत.
जि.प.च्या शिलकीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी
जिल्हा परिषदेचे १ कोटी ४ लाख ६० हजार शिलकीच्या अंदाजपत्रकाला अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली.
First published on: 06-04-2013 at 03:32 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surplus budget sanction of zp